नवीन नांदेड(रमेश ठाकूर)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन स्कूल ऑफ इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊनगर, खुपसरवाडी, नांदेड येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘‘मातोश्री-2016’’मध्ये राजमाता जिजाऊ मंचावर दुपारनंतर आंबेडकरी जलसाचे सादरीकरण करण्यात आले. या मध्ये चार जिल्ह्यातून २३ महाविध्यालयांनी सहभाग नोंदवला होता. स्वारातिम विद्यापीठाच्या संघाने आंबेडकरी जलसा सादर केला.
बाद्शाहके बादशहा बाबासाहब है,
क्योंकी सभी बादशहा इन्संनोको गुलाम बनाकर बादशहा बनगये
लेकिन सिर्फ डॉ. बाबासाहेब गुलमोनको इन्सान बनकर बादशहा बंगई
इसिलीये डॉ. बाबासाहेब बादशहा के बादशहा बनगये.
असा आंबेडकरी जलसा प्रा. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल बेळीकर, मंगेश गाडगे, विश्व्जीत वाघमारे, गजानन बेंद्रे, साईनाथ ओनरवाड, श्रीकांत शेट्टे, यांनी सादर केला आहे.
कंधारच्या शिवाजी महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसा सादर केला.
उजाड राणी किमया केली मोठी ,
भीमा तुला प्रणाम कोटी-कोटी.
सचिन सोनकांबळे, विशाल कौशल्य, रामेश्वर तेलंगे, प्रदीप वाघमारे, सचिन मोकामपल्ले, अजित ससाणे, यांनी जलसा सादर केला. या आंबेडकरी जलसा कार्यक्रमासाठी विध्यार्थी आणि त्याच बरोबर कामाजी पवार, जयश्री पवार, व्यंकट चारी, सतीश शिंदे, अरविंद पाटील, विमलताई सिरसाट, सोपान क्षीरसागर यांनी हि आनंद लुटला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आशा घोषणा विध्यार्थी देत होते.
बहिणाबाई चौधरी मंचावर रांगोळी स्पर्धा
-----------------------
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन स्कूल ऑफ इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊनगर, खुपसरवाडी, नांदेड येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘‘मातोश्री-2016’’मध्ये बहिणाबाई चौधरी मंचावर रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय, किनवटच्या महेंद्र मेश्राम, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरच्या ए.एन.गायकवाड, आदर्श एज्युकेशन सोसायटीचे कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोलीच्या कांचन वगरे, लोकमान्य महाविद्यालय, सोनखेडच्या किशोर मोरे यांच्यासह ३४ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
अहिल्याबाई होळकर मंचावर विडंबन कला सादर
--------------------
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन स्कूल ऑफ इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊनगर, खुपसरवाडी, नांदेड येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘‘मातोश्री-2016’’मध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकर मंचावर विडंबन हा कला प्रकार सादर करण्यात आला. नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सबसे बुरा कौन है ही विडंबना सादर केली. डॉ. सुजाता कदम, डॉ. अमोल करवा यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश परेल, भास्कर गणोरे, सुनील नवघरे, जयंती सरपाते, सुकेश पेंद्रे, मयूर गलांडे यांनी सादर केले. यामध्ये सायन्स कॉलेज, नांदेड, एम.जी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नांदेड, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा, गुरुबुध्दीस्वामी महाविद्यालय, पूर्णा, नूतन महाविद्यालय, सेलू या महाविद्यालयासोबतच २१ महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.
जिजाऊ मंचावर शास्त्रीय नृत्य
-----------------
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन स्कूल ऑफ इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊनगर, खुपसरवाडी, नांदेड येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘‘मातोश्री-2016’’मध्ये राजमाता जिजाऊ मंचावर शास्त्रीय नृत्य एन. एस. बी. कॉलेज येथील प्रा. अशोक ठावरे, यांच्या मार्गदर्शनाखाली विजयालक्ष्मी आंबेकर यांनी शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यांच्या सोबत दीप्ती उबाळे यांनी गायन केले, तर वादक म्हणून श्रीनाथ व पंकज यांनी त्यांना साथ दिली.
याच मंचावर सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यापक महाविद्यालय, विष्णूपुरीची मानसी जाधव यांनी तोडी अभिनयाद्वारे कथक नृत्याचे सादरीकरण केले.
प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या प्रा. जयश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूचे दहा अवतार म्हणजेच दशावतारम कुचिपुडी या शास्त्रीय नृत्याद्वारे गणेश कवाडे यांनी सादर केले. डॉ. भारत जेठवानी यांनी यावेळी गायन केले तर बलराज आण्णा यांनी वादकांची भूमिका पार पडली. याशिवाय आय.टी.एम. कॉलेज, नांदेड, एम.जी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नांदेड, यशवंत महाविद्यालय, नांदेड, के.आर.एम. महिला महाविद्यालय, नांदेड, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय, वसमतनगर,कॉलेज ऑफ कंप्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी(कॉक्सिट), दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांनी सहभाग घेतला.
Read more at http://www.nandednewslive.com/Nanded_Ardhapur-17326-580cbba955d48-1.html#VeHqFXLe7755lqQM.99

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा